प्रसिद्ध अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक नीरज व्होरा यांचे 14 डिसेंबर रोजी सकाळी मुंबईत निधन झाले. ते 54 वर्षांचे होते. काही महिन्यांपूर्वी हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानंतर त्यांची प्रकृती सातत्याने खालावत गेली. ऑक्टोबर महिन्यात त्यांना उपचारासाठी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांच्या प्रकृतीत विशेष सुधारण झाली नाही. अखेर त्यांचे सर्वात जवळचे मित्र ख्यातनाम चित्रपट निर्माते फिरोज नाडियाडवाला यांनी त्यांना स्वतःच्या घरी नेले. नीरज लवकरात लवकर बरे व्हावे म्हणून फिरोज यांनी त्यांच्या घरातील एका खोलीत आयसीयू कक्ष तयार करवून घेतला होता.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews